Tejomaya Bharat

Fascinating Stories about Bharat (India) in Marathi and English

Listen on:

  • Podbean App

Episodes

Wednesday Jul 08, 2020

नावनीतकम किंवा बावर म्यानुस्क्रिप्ट मध्ये एकूण सात भाग होते - दोन ज्योतिष, 2 बौद्ध तत्वज्ञा आणि तीन आयुर्वेद / वैद्यक शास्त्र विषयक. अशा या नावनीतकम पोथीच्या मंगलाचरणात आपल्याला हिमालयात वैद्यकीय शास्त्र शिकणाऱ्या दहा मुनींची नावे सापडतात - अत्रेय, हरित, पराशर, भेल, गर्ग, सांबव्य, वसिष्ठ, कराल, काप्या आणि आपला सुश्रुत!

Monday Jul 06, 2020

हरर्न्ले नावाच्या एका अभ्यासकाने, अत्यंत चिकाटीने जवळजवळ दोन दशकं खर्च करून, बावर पोथी कसं सोडवलं - आणि त्या पोथीत त्याला अफाट खजिना सापडला हे आपण या भागात ऐकणार आहोत. 

Monday Jul 06, 2020

या भागात आपण पाहणार आहोत की कसं एकोणिसाव्या शतकात ब्रिटन आणि रशिया मध्ये झालेल्या द ग्रेट गेम मधल्या अनेक घडामोडी एका ब्रिटिश हेराचा खून झाला. या खूनाचा शोध घेताना हॅमिल्टन बावर या अधिकाऱ्याला अनपेक्षितपणे एक रहस्यमय पोथी सापडते. ही पोथी आत्तापर्यंतचा आपला सगळ्यात महत्वाचा शोध असणार आहे...

Sunday Jul 05, 2020

या भागात आपण सुश्रुत संहितेत सुशृता बद्दल आपल्याला काय माहिती सापडते ते पाहणार आहोत. सुश्रुत समितेचे संस्कृत मधून इंग्रजी मध्ये सर्वात अभ्यासपूर्ण भाषांतर केले आहे कवी कुंजलाल अभिषगरत्न यांनी. कवीराजांनी त्यांना उपलब्ध असलेली जिथे सुशृता चा उल्लेख आला होता अशी सर्व हस्तलिखित तपासून अभ्यासून पाहिली होती. पाहुयात त्यांना काय सापडले ते.

Sunday Jul 05, 2020

ऑनलाइन शोधल्यावर आपल्याला जे चित्र दिसतं त्यात एक दाढीवाला माणूस कुठलीशी शस्त्रक्रिया करतो आहे आणि दोन मदतनिसांनी त्या रुग्णास धरून ठेवले आहे, एक स्त्री मदतनीस लगबगीने काही घेऊन येत आहे तर अजून एक विद्यार्थी हे सगळं उभं राहून निरीक्षण करताना दिसतो. इतकी सखोल माहिती देणारे चित्र नक्कीच भारतीय राजा रविवर्मा यांनी काढले असावे असे वाटते... परंतु बरीच शोधाशोध केल्यावर लक्षात येतं की हे चित्र अमेरिकन चित्रकार रॉबर्ट थोम यांनी आठ वर्षाच्या संशोधनानंतर साकारले आहे.

Sunday Jul 05, 2020

या भागात आपण पाहणार आहोत की कावस्जीचे नाक दुरुस्त करायला वापरलेली पद्धत त्याला म्हणतात नासिकासाधना आणि ही पद्धत आपल्याला सुश्रुत संहितेत आढळते. सुश्रुत हा शस्त्रक्रियेचा जनक आहे हे आता सर्वमान्य आहे आणि हातात असलेल्या माहितीच्या आधारे तो इसवीसनपूर्व सहाशे वर्षांपूर्वी होऊन गेला असे आता निश्चित म्हणता येते. म्हणूनच अडीच हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली नासिकासाधना पद्धत वापरून कावस्जीचे नाक दुरुस्त केले असे आपल्याला खात्रीशीरपणे म्हणता येते.

Saturday Jul 04, 2020

आपली गोष्ट सुरू होते 1794 मध्ये द जेंटलमॅन मॅगझिन नावाच्या एका मासिकात छापून आलेल्या पत्रांनी. या पत्रात ब्रिटिश डॉक्टर्स थॉमस करुसो आणि जेम्स फिंडले यांनी कावस्जी नावाच्या एका पुणेरी माणसावर झाले या शस्त्रक्रिया बद्दल माहिती होती!
या आणि पुढच्या अनेक मालिकांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.
 

Saturday Jul 04, 2020

Copyright 2020 All rights reserved.

Podcast Powered By Podbean

Version: 20221013